जोशीमठ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

जोशीमठ

जोशीमठ हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. जोशीमठ उत्तराखंडच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले असून ते राजधानी डेहराडूनच्या २९५ किमी ईशान्येस स्थित आहे. बद्रीनाथ हे चार धामपैकी एक तीर्थक्षेत्र येथून जवळच आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान येथे जाण्यासाठी देखील अनेक पर्यटक जोशीमठला भेट देतात. राष्ट्रीय महामार्ग ५८ जोशीमठमधून जातो.

आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांपैकी जोशीमठ सर्वात उत्तरेकडील आहे (शृंगेरी, पुरी व द्वारका हे इतर तीन मठ). शंकराचार्यांच्या कल्पनेनुसार हा मठ अथर्ववेदासाठी जबाबदार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →