जॉली एलएलबी हा २०१३ चा भारतीय हिंदी भाषेतील डार्क कॉमेडी कोर्टरूम ड्रामा चित्रपट आहे जो सुभाष कपूर लिखित आणि दिग्दर्शित आहे आणि फॉक्स स्टार स्टुडिओ निर्मित आहे. १५ मार्च २०१३ रोजी प्रकाशीत झालेला, अर्शद वारसी, बोमन इराणी, अमृता राव आणि सौरभ शुक्ला यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट ॲडव्होकेट जगदीश त्यागी यांच्या सुरुवातीच्या आयुष्याभोवती फिरतो, ज्यांना जॉली म्हणूनही ओळखले जाते. सहा निष्पाप मजुरांना त्यांचा न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नावर ही कथा लक्ष केंद्रित करते. श्रीमंतांच्या मक्तेदारी आणि न्यायालयीन भ्रष्टाचाराविरुद्धचा ह्यात प्रवास आहे. कथानक १९९९ मध्ये संजीव नंदा यांच्या हिट-अँड-रन प्रकरणावरून आणि प्रियदर्शनी मट्टू प्रकरणाच्या आशायावरून प्रेरित आहे. जॉली एलएलबी २ हा फेब्रुवारी २०१७ मध्ये रिलीज झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जॉली एलएलबी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.