जॉर्ज एव्हरेस्ट

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जॉर्ज एव्हरेस्ट

सर जॉर्ज एव्हरेस्ट (४ जुलै, १७९० – १ डिसेंबर, १८६६) हे ब्रिटिश सर्वेक्षक आणि भूगोलतज्ञ होते. त्यांनी १८३० ते १८४३ या कालावधीत भारताचे सर्वेक्षक जनरल म्हणून कार्य केले.

मार्लो येथे लष्करी शिक्षण घेतल्यानंतर, एव्हरेस्ट यांनी ईस्ट इंडिया कंपनीत प्रवेश केला आणि १६ व्या वर्षी भारतात आले. त्यांना विलियम लॅम्बटन यांचे सहायक म्हणून नेमण्यात आले आणि ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्व्हे मध्ये काम सुरू केले. १८२३ मध्ये लॅम्बटन यांच्या मृत्यूनंतर, एव्हरेस्ट यांनी त्यांची जागा घेतली आणि या सर्वेक्षणाचे संचालक म्हणून कार्य केले. एव्हरेस्ट यांनी भारताच्या दक्षिणेकडील टोकापासून नेपाळपर्यंत, सुमारे २४०० किलोमीटर (१५०० मैल) अंतरावर मेरिडियन आर्क चे सर्वेक्षण केले. हे काम १८०६ ते १८४१ पर्यंत चालले. १८३० मध्ये त्यांची भारताचे सर्वेक्षक जनरल म्हणून नियुक्ती झाली, आणि १८४३ मध्ये त्यांनी निवृत्ती घेऊन इंग्लंडला परतले.

१८६५ मध्ये, रॉयल जिओग्राफिकल सोसायटीने पीक XV या जगातील सर्वात उंच शिखराला माउंट एव्हरेस्ट असे नाव दिले, जे एव्हरेस्ट यांच्या सन्मानार्थ होते. त्यांचे शिष्य आणि सर्वेक्षक जनरलचे उत्तराधिकारी अँड्र्यू स्कॉट वॉ यांनी १८५६ मध्ये त्यांच्या नावाची शिफारस केली. माउंट एव्हरेस्टला अनेक स्थानिक नावे होती, परंतु सर्वांसाठी योग्य नाव निवडण्याच्या अडचणीमुळे एव्हरेस्ट यांचे नाव निवडण्यात आले. सुरुवातीला एव्हरेस्ट यांनी या सन्मानाला नकार दिला, कारण त्यांचा शिखराच्या शोधात कोणताही सहभाग नव्हता आणि त्यांचे नाव हिंदीत लिहिणे किंवा उच्चारणे सोपे नाही असे त्यांचे मत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →