जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात माडबन-जैतापूर येथे होऊ घातलेला प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प आहे. तब्बल ९,९०० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असून, विदेशी सहकार्यातून साकारला जात असलेला भारतातील पहिला प्रकल्प आहे . एकूण एक लाख कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे.
६ डिसेंबर २०१०ला या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील २ युरोपियन प्रेशराइज्ड अणुभट्यांची बांधणी व २५ वर्षापर्यंत अणूइंधन पुरवण्यासाठी करार करण्यात आला. फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सार्कोझी व भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
फ्रान्सची अणुउर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी अरेवा व भारताची अणुउर्जा कंपनी न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या मध्ये हा ९३० कोटी डॉलरचा करार करण्यात आला.
या प्रकल्पामध्ये ६ युरोपियन प्रेशराइज्ड अणुभट्या प्रस्तावित आहेत. या अणुभट्ट्यांची संकल्पना व विकास फ्रान्सच्या अरेवा कंपनीने केला आहे. प्रत्येक अणुभट्टी १६५० मेगावॉट वीज उत्पादन करणार आहे. म्हणजे एकूण ९९०० मेगावॉट वीज या प्रकाल्पातून निर्माण होणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च अंदाजे १,००,००० कोटी रुपये(?) आहे. या प्रकारच्या अणुभट्ट्या जगात अजून कुठेही कार्यान्वित नाहीत पण फिनलंडमध्ये १, फ्रान्समध्ये १ व चीनमध्ये २ अणुभट्ट्याची बांधणी चालू आहे. चीनने अरेवा बरोबर ३ अनुभट्ट्यांसाठी करार केला आहे. त्यातील ताईशान १ ही अणुभट्टी २०१३त, व ताईशान २ ही अणुभट्टी २०१४मध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प
या विषयातील रहस्ये उलगडा.