पारादीप तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा पारादीप रिफायनरी हा ओडिशा राज्यातील पारादीप शहरात इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसीएल) स्थापन केलेली तेल शुद्धीकरण कारखाना आहे. प्रतिवर्ष १५ दशलक्ष टन स्थापित क्षमतेसह हे २०१६ मध्ये कार्यान्वित झाले. ही रिफायनरी अंदाजे ३,३४५ एकर जागेवर पसरलेली आहे आणि पारादीप बंदरापासून नैऋत्येस अंदाजे ५ किमीवर आहे.
या प्रकल्पाची संकल्पना १९९५ मध्ये पुढे ठेवण्यात आली आणि १९९८ मध्ये सरकारने त्याला मान्यता दिली. याची पायाभरणी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मे २००० मध्ये केली होती. प्रकल्पाला अनेक विलंब झाला. या प्रकल्पासाठी आयओसीएल च्या बोर्डाने फेब्रुवारी २००९ मध्ये अंतिम मंजूरी दिली होती. या रिफायनरीचा प्रकल्प प्रत्यक्षात मार्च २०१२ पर्यंत स्थापन होऊन नोव्हेंबर २०१२ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होणे अपेक्षित होते, परंतु आर्थिक मर्यादेमुळे या प्रकल्पाच्या कार्याला विलंब झाला आणि शेवटी फेब्रुवारी २०१६ मध्ये रिफायनरीचे उद्घाटन झाले.
७ फेब्रुवारी २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्याला देशाच्या सेवेत समर्पित केले. हा प्रकल्प अंदाजे रु. ५२,५५५ कोटी खर्च करून उभारण्यात आला आहे.
पारादीप तेल शुद्धीकरण प्रकल्प
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.