जेरोम क्लॅप्का जेरोम (इंग्लिश:Jerome Klapka Jerome;) (मे २, इ.स. १८५९ - जून १४, इ.स. १९२७) हा इंग्लिश लेखक व विनोदकार होता. त्याची 'थ्री मेन इन अ बोट' ही साहित्यकृती प्रसिद्ध आहे.
जेरोमाचा जन्म वॉल्सल, इंग्लंडातील काल्डमोर या गावी झाला. त्याचे बालपण लंडनात हलाखीत गेले. त्याने लंडनातील सेंट मेरिलिबोन ग्रामर स्कूल येथे शालेय शिक्षण घेतले.
'थ्री मेन इन अ बोट' या साहित्यकृतीच्या जोडीनेच त्याची 'आयडल थॉट्स ऑफ अॅन आयडल फेलो' आणि 'सेकंड थॉट्स ऑफ अॅन आयडल फेलो' हे निबंधसंग्रह, थ्री मेन ऑन अ बमेल, अ सिक्वल टू थ्री मेन इन अ बोट, इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत.
जेरोम के. जेरोम
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.