जलालुद्दीन मुहम्मद अकबर (جلال الدین محمد اکبر) (ऑक्टोबर १५, इ.स. १५४२ - ऑक्टोबर १२, इ.स. १६०५) हा इ.स. १५५६ पासून मृत्यूपर्यंत मुघल सम्राट होता. हा भारताचा चा तिसरा मुघल सम्राट होता. याला अकबर-ए-आझम (महान अकबर किंवा अकबर द ग्रेट) असेही संबोधले जाते.
अकबर तीमुरीद घराण्यातील नसिरुद्दीन हुमायूॅंचा पुत्र आणि भारतात मुघल घराण्याची स्थापना करणाऱ्या झाहीरुद्दिन मुहम्मद बाबर चा नातू व वारसदार होता. अकबरचा राज्यकाळ १६०५ साली संपण्या आधी, शेवटच्या वर्षानमध्ये मुघल साम्राज्याने जवळ जवळ संपूर्ण उत्तर आणि मध्य भारत व्यापला होता, व ते तत्कालीन शक्तिशाली राज्यांपैकी एक होते."विस्तीर्ण राज्य".
हुमायूंच्या मृत्यूपश्चात वयाच्या १३व्या वर्षी सम्राटपदी विराजमान झाला. आपल्या राज्यकाळादरम्यान त्याने शेरशाह सूरीचा पाडाव केला व पानिपतच्या दुसऱ्या लढाईत हिंदू राजा सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य ऊर्फ हेमूचा पराभव केला. पुढे संपूर्ण उत्तर आणि मध्ये भारत त्याच्या एकत्रित सत्तेत आणायला जवळ जवळ वीस वर्ष लागली. अर्थातच संपूर्ण भारतीय उपमहाद्विपावर त्याचा ठळक प्रभाव पडला. सम्राट असताना त्याने आपले राज्य आणखी बळकट करण्यासाठी तत्कालीन बलाढ्य हिंदू राजपूत जातीशी सुत जुलावण्याचेही प्रयत्न केले. त्यासाठी त्याने राजपूत राजकन्येला आपल्या हरम मध्ये दाखल केले.
अकबर चा एकूण देशाच्या संस्कृतीवर बराच प्रभाव पडला. अकबराला स्वतःला रंग्कामांत भरपूर रुची होती, व त्याच्या महालांच्या भिंती आखीव कलाकृतींनी सजवलेल्या असायच्या. मुघल कले बरोबरच त्याने युरोपिअन कलानाही प्रोत्साहन दिले. स्वतः साहित्याचा रसिक असल्याने त्यांनी बरेच संस्कृत साहित्य पर्शियन मध्ये आणि पर्शियन साहित्त्य संस्कृत मध्ये भाषांतर करून घेतले. हिंदू आणि इस्लामेतर धर्मान विषयीचा त्याचा असहिष्णू दृष्टीकोन, राजपूत राजकन्येशी वैवाहिक बोलणी सुरू झाल्यानंतर बराच बदलला, व नंतर तो इस्लामेतर धर्मांविषयी बरीच सहनशीलता बाळगून राहिला. पुढे त्यांनी धार्मिक चर्चा सुरू केल्या, ज्यात मुसलीम विद्वान सिख, हिंदू, चार्वाक, नास्तिक, ज्यू, पोर्तुगीज आणि ख्रिश्चन विद्वानांबरोबर धार्मिक विषयांवर चर्चा करत असत. ह्या सगळ्या विद्वानांचा तो सन्मान करत असे. त्याच्या सहनशीलतेचे उदाहरण म्हणजे त्याने मुघल झेंड्यावर कॅथोलिक अल्पसंख्यकांच्या सन्मानार्थ ख्रिस्ती क्रॉस कार्यरत केला. पुढे त्याने दीन-ए-इलाही या धर्माची स्थापना केली. दुर्दैवाने हा धर्म म्हणजे व्यक्तीप्रभावित पंथच ठरला व त्याच्या मृत्यूनंतर नाहीसा झाला .
अकबर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.