जेम्स रेव

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जेम्स एडवर्ड केनेथ रेव (जन्म ११ जानेवारी २००४) हा एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. जुलै २०२१ मध्ये, भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान त्यांच्याविरुद्ध तीन दिवसांचा सामना खेळण्यासाठी काउंटी निवडक एकादश संघात रेवची ​​निवड करण्यात आली होती. रेवने २० जुलै २०२१ रोजी या सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने १ ऑगस्ट २०२१ रोजी २०२१ रॉयल लंडन वन-डे कपमध्ये समरसेट संघाकडून लिस्ट अ क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

डिसेंबर २०२१ मध्ये, वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२२ स्पर्धेसाठी इंग्लंडच्या संघात त्याची निवड करण्यात आली. त्याने २७ मे २०२२ रोजी इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या 'श्रीलंका क्रिकेट डेव्हलपमेंट इलेव्हन' विरुद्ध समरसेट संघाकडून खेळताना टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जुलै २०२२ मध्ये, एसेक्सविरुद्धच्या काउंटी चॅम्पियनशिप सामन्यात रेवने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले पहिले शतक झळकावले.

जानेवारी २०२५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या 'इंग्लंड लायन्स' संघात रेवचा समावेश करण्यात आला.

मे २०२५ मध्ये, १९३९ मधील डेनिस कॉम्पटननंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० शतके पूर्ण करणारा रेव हा सर्वात तरुण इंग्लिश खेळाडू ठरला. त्याच महिन्याच्या उत्तरार्धात, दुखापतग्रस्त जॉर्डन कॉक्सच्या जागी त्याला इंग्लंडच्या कसोटी संघात बोलावण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →