जुलिएट स्टीवन्सन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जुलिएट स्टीवन्सन

ज्युलिएट ॲन व्हर्जिनिया स्टीव्हन्सन (जन्म ३० ऑक्टोबर १९५६) ही नाटक, चित्रपट आणि दुरदर्शनची एक इंग्रजी अभिनेत्री आहे. ट्रूली, मॅडली, डीपली (१९९१) या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिला ओळखले जाते, ज्यासाठी तिला प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. एम्मा (१९९६), बेंड इट लाइक बेकहॅम (२००२), मोना लिसा स्माइल (२००३), बिइंग जुलिया (२००४), इन्फेमस (२००६) या चित्रपटांचा तिच्या कारकिर्दीत समावेश आहे. डेथ ॲन्ड द मेडन (१९९१-९२) या नाटकातील कामासाठी तिला लॉरेन्स ऑलिव्हिये पुरस्कार मिळाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →