जुनून (उर्दू : جنون) हा लाहोर, पाकिस्तान इथला १९९० साली बनलेला एक सुफी रॉक संगीत गट आहे. हा गट सलमान एहमद ह्याच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. गटाचे निर्माण मुख्य गीतार वादक व गीतलेखक अहमद, कीबोर्ड वादक नुसरत हुसैन, व गायक अली अझमत ह्यांने केले. जुनून हा पाकिस्तानच्या व आशियाच्या सगळ्यात यशस्वी गटांपैकी आहे; 'निऊ योर्क टाइम्स' ह्या वर्तमानपत्राने त्यांना पाकिस्तानचे 'U2' अशी उपमा दिली. सुरुवातीपासून तर आता पर्यंत, जुनून ने एकूण १९ अल्बम प्रकाशित केले; ज्यात ७ स्टुडिओ अल्बम, एक चित्रपट गाणे, २ प्रत्यक्ष अल्बम, ४ विदिओ अल्बम, व ५ संकलन अल्बम आहेत. त्यांचे जगभरात ३ करोडहून जास्त अल्बम विकले गेले आहेत.
जुनूनला सुफी रॉक ह्या संगीतप्रकाराचे आद्य चासाहात्कार असे समजले जाते. १९९१ला 'जुनून' हा अल्बम प्रकाशित झाल्यावर जुनूनचे सदस्य हे ई. एम. आई. रेकॉर्ड्स ह्या लेबल कंपनीला जुळले गेले. दोन वर्षांने गटाने त्यांचा दुसरा अल्बम तलाश(१९९३) प्रकाशित केला. ह्या अल्बम मध्ये गटात नवीन बेस वादक ब्रायन ओ कोनल ह्याने सदर केले, व नुसरत हुसैन ने ह्या अल्बम अगोदरच गट सोडला. दुसऱ्या अल्बम नंतर गटाला मोठी प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. १९९६ मध्ये जुनूनने 'इन्कलाब' हा अल्बम प्रकाशित केला. 'इन्कलाब' नंतरच जुनुनला देशभर प्रसिद्धी मिळाली. ह्या अल्बम मध्ये वेस्टर्न व सुफी प्रकारचे वादन, ब्लूज संगीतासारखे गायन, व शास्त्रीय वाद्य जसे कि तबला, आणि जुने पाकिस्तानी काव्य ह्याचा वापर केलेला आहे. १९९७ मध्ये गटाचा सर्वात स्तुत्य अल्बम 'आझादी' हा प्रकाशित झाला. आझादी हा भारतात प्रकाशित होणारा जुनूनचा पहिला अल्बम आहे. त्यानंतर १९९९ मध्ये 'परवाझ', २००१ मध्ये 'अंदाज', २००३ मध्ये 'दिवार' ह्या अल्बुमांमुळे व सतत संगीत कार्यक्रमांमुळे जुनुनला जगभर प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या २५ वर्ष्याच्या वर्धापनदिनी जुनूनने 'दूर' हा अल्बम २०१६ला प्रकाशित केला.
जुनूनचे संगीत प्रेरणा स्थान इंग्रजी गट 'लेड झेपलिन' व नुसरत फतेह अली खान आहेत असे गटाचा मुख्य गीतलेखक अहमेद सांगतो. मौलाना रुमी, अल्लामा इक़्बल, बुल्लेह शाह ह्या कवींच्या कवितांचा देखील जुनूनच्या गीतांवर प्रभाव दिसून येतो.
१९९८ च्या चानल वी पुरस्कारांमध्ये जुनुनला 'बेस्ट इंटरनाशनल संगीतकार' हा पुरस्कार डेफ लेपर्ड, स्टिंग व प्रोदिगी ह्या सुप्रसिद्ध संगीतकारांना व गटांना मात करून मिळाला. 'सय्योनी', जे कि त्यांचा सर्वात प्रसिद्ध गण म्हणून समजलं जाते, एम. टी. वी. व चानल वी वर दोन महिने शीर्षस्थानी होते.
जुनून (संगीत गट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.