जिल्हा न्यायालय पुणे मेट्रो स्थानक

या विषयावर तज्ञ बना.

जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक (पूर्वीचे "सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक") हे पुण्यातील एक मेट्रो स्थानक आहे. येथे क्रॉस-प्लॅटफॉर्म अदलाबदल करायची सुविधा आहे. पुणे मेट्रोमधील अ‍ॅक्वा मार्गिके आणि जांभळ्या मार्गिके दरम्यान. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून १ ऑगस्ट २०२३ रोजी हे स्थानक उघडण्यात आले. हे स्थानकपुणे मेट्रोच्या ३ऱ्या मार्गिकेसाठी भविष्यातील अदलाबदल स्थानक म्हणून देखील काम करेल. जांभळ्या मार्गिकेवरील फलाट ३३मी (१०८)फुटाच्या खोलीचे भारतातील सर्वात खोल फलाटांपैकी एक आहे. स्थानकाच्या छताच्या स्थापत्य रचनेमुळे नैसर्गिक सूर्यप्रकाश थेट भूमिगत फलाटावर पडू शकतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →