जावेद पाशा कुरैशी यांचा जन्म गडचिरोलीत १२ जानेवारी १९६२ ला झाले. गडचिरोली जिल्यातील आदिवासीबहुल, अठरापगड़ जातीच्या गावात त्याचे पालनपोषण झाले. त्यांचे वडील अब्दुल गणी अब्दुल कादिर क़ुरैशी हे महसूल विभागात नोकरीला होते.
जावेद कुरैशी हे सूफी-संतवादी विचारांचे आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरीच्या आश्रमात झाले . जावेद पाशा कुरैशी सध्या नागपूरमध्ये राहतात. जावेद पाशा कुरैशी मुस्लिम मराठी लेखक आहेत. परन्तु फुले-शाहू-आम्बेडकरी विचारधारेचे व आन्दोलनाचे मान्यवर आहेत. त्यांनी विविध विषयावर आत्तापर्यत ३8 पुस्तके लिहिली आहेत. ते भारतीय मुस्लिम परिषद या सामाजिक, राजकीय प्रबोधनवादी संघटनेचे अध्यक्ष आहेत! त्यांना आतार्यन्त 236 विविध सामाजिक संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत.
ते उत्कृष्ठ कलावंत असून अनेक गाजलेली नाटके सादर केलेली आहेत. नाट्य लेखक, दिग्दर्शक म्हणूनही त्यांचा लौकिक आहे.
महाराष्ट्रात उत्कृष्ट वक्ते, प्रबोधनकार विविध आन्दोलनाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात! मुस्लिम साहित्य चळवळ, मुस्लिम ओबीसी चळवळीचे ते प्रणेते आहेत. मुस्लिम आरक्षण व मुसलमानांच्या जातिव्यवस्थेवर त्यांचा सखोल अभ्यास आहे.
जावेद कुरैशी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.