जादवपूर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता महानगराच्या दक्षिण क्षेत्रामधील जादवपूर परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ दक्षिण २४ परगणा जिल्ह्यामध्ये आहेत. जादवपूर हा तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांपैकी एक समजला जातो. तृणमूलचे उमेदवार येथून आजवर सहा वेळा निवडून आले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जादवपूर लोकसभा मतदारसंघ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?