जलसिंचन- पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पुरक पाण्याला जलसिंचन असे म्हणतात. भारतातील ४५० जिल्ह्यांपैकी बागायत क्षेत्र असलेल्या ४४ जिल्ह्यांमधून देशाच्या अन्नधान्य उत्पादनापैकी ५०% उत्पादन होते. या ४४ जिल्ह्यांपैकी जास्त सिंचन क्षेत्र असणाऱ्या १४ जिल्ह्यांत देशाच्या २५% अन्नधान्याचे उत्पादन मिळते. यावरून शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व लक्षात येते. पृथ्वीचा ७१% भाग पाण्याने व्यापलेला आहे. यापैकी ९७% पाणी खारे असून ते समुद्रात आहे.जागतिक पाण्याच्या वितरणाच्या बाबतीत भारताचा जगात ब्राझिल, रशिया, चीन, कॅनडा नंतर पाचवा क्रमांक लागतो. परंतु जलसिंचनाखालील क्षेत्राच्या बाबतीत भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. भारतात सरासरी ११९ सेमी पाउस पडतो. भारतात एकूण ४०० दशलक्ष हेक्टर पाणी मिळते. त्यापैकी ११५ दशलक्ष हेक्टर मी. पाणी वाहून जाते, २१५ दशलक्ष हेक्टर मी. जमिनीत मुरते व ७० दशलक्ष हेक्टर मी. पाण्याची वाफ होते. पृष्ठभागावरून वाहणाऱ्या पाण्यापैकी १५ दशलक्ष हेक्टर मी. पाणी धरणात अथवा तळ्यात साठविले जाते.धरणाच्या पाण्यापैकी वाफे द्वारे नष्ट होणारे पाणी – २०.५% तळ्यातील पाण्यापैकी वाफे द्वारे नष्ट होणारे पाणी – ४०% कालव्यातून होणारी पाण्याची गळ – २० ते ३०% प्रत्यक्षात पिकांना मिळणाऱ्या पाण्यापैकी ९९% पाण्याचे बाष्पोत्सर्जन होते व उरलेले १% पाणी पीक वाढीसाठी वापरले जातात.भारतीय नद्यांच्या १८६९ क्यूबिक किमी पाण्यापैकी ६९० क्यूबिक किमी पाणी उपयुक्त आहे. तर भूगर्भातील ४३२ क्यूबिक किमी पाणी उपयुक्त आहे.
जलसिंचनाचे उद्देश
मोसमी पास असल्यामुळे इतर ऋतूत पीके घेणे
वर्षातून एकापेक्षा जास्त पीके घेणे
नगदी पीके घेणे
रासायनिक खते लागू पडण्यासाठी
दर हेक्टरी जास्त उत्पादन घेणे
जलसिंचन पद्धती
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.