जयंत भालचंद्र बापट (इ.स. १९३७?? - ) हे मराठी लेखक आहेत. हे मूळचे वाईचे आहेत.
त्यांचे गॉडेसेस ऑफ इंडिया, नेपाल अँड तिबेट हे पहिले पुस्तक मोनाश आशिया इन्स्टिट्यूटच्या मदतीने प्रकाशित झाले.
इ.स. १९६५ साली ते अमेरिकेतील युटा विद्यापीठाचे आमंत्रण नाकारून ऑस्ट्रेलियातील मेलबोर्नच्या मोनाश विद्यापीठात पीएच.डी.साठी दाखल झाले. त्यानंतर ते तेथेच ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे प्राध्यापक झाले. इ.स. १९९७ साली निवृत्त झाल्यानंतर तयांनी संशोधनात्मक पुस्तके लिहायला सुरुवात केली.
१९८०मध्ये बापटांच्या मित्राची पत्नी कॅन्सरने वारल्यावर मरणोपरान्त करावयाच्या धार्मिक विधी करण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या दातार नावाच्या गृहस्थांकडून हिंदू पौरोहित्याचे प्राथमिक धडे घेतले आणि यथोचित क्रियाकर्म केले. तेव्हापासून पुढे बापटांनी ऑस्ट्रेलियात हिंदू पौरोहित्याची ७००पेक्षा अधिक कामे केली आहेत.
बापट हे मेलबोर्नमधील ऑस्ट्रेलियन इंडियन सोसायटी ऑफ व्हिक्टोरिया (AISV)चे संस्थापक सदस्य आहेत. ही संस्था भारतीय आणि अन्य स्थानिक लोकांमधीला एक दुवा आहे. भारतातून पगारी पुरोहित येईपर्यंत सोसायटीने आयोजित केलेल्या सर्व प्रकारच्या पूजा बापट करीत.
जयंत भालचंद्र बापट
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.