जय भीम कॉम्रेड हा २०११ मधील आनंद पटवर्धन दिग्दर्शित भारतीय माहितीपट आहे. १९९७ च्या रमाबाई हत्याकांडातील पोलीस हिंसाचाराच्या वर्णनाने या चित्रपटाची सुरुवात झाली आहे. हा माहितीपट मुंबईतील दलित लोकांच्या जीवनाचे आणि राजकारणाचे विविध पैलूंवर प्रकाश टाकतो. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी १४ वर्षांचा कालावधी लागला आणि रमाबाईच्या घटनेच्या खटल्यांच्या निकालानंतर २०११ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात दर्शविला गेला आणि त्याला प्रचंड सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली. याने असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जय भीम कॉम्रेड
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.