जमुना (३० ऑगस्ट १९३६ - २७ जानेवारी २०२३; पुर्वाश्रमीच्या निप्पानी ) ह्या एक भारतीय अभिनेत्री, दिग्दर्शक आणि राजकारणी होती ज्या मुख्यत्वे तेलुगू सिनेमात दिसल्या. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी डॉ. गरिकापती राजाराव यांच्या पुट्टील्लू (१९५३), मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि एल.व्ही. प्रसाद यांच्या मिसम्मा (१९५५) मधून त्यांना यश मिळाले. त्यांच्या कारकीर्दीमध्ये तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे. त्यांनी फिल्मफेअर पुरस्कार आणि साऊथ फिल्मफेअर पुरस्कारमध्ये पुरस्कार जिंकले. त्या ९ व्या लोकसभेत (१९८९-९१) राजमुंद्री मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार होत्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जमुना (अभिनेत्री)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?