आमनी (जन्म: १६ नोव्हेंबर १९७२) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तीने काही तमिळ आणि कन्नड चित्रपटांव्यतिरिक्त प्रामुख्याने तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ईव्हीव्ही सत्यनारायण दिग्दर्शित 'जांबा लकिडी पंबा' (१९९२) या तेलुगू चित्रपटातून मुख्य भूमिकेत पदार्पण केले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. तिला दोन राज्य नंदी पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाला आहे.
तिने बापू दिग्दर्शित 'मिस्टर पेल्लम' (१९९३) या चित्रपटात काम केले होते. ज्याला तेलुगूमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. 'शुभ लग्नम' (१९९४) या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - तेलुगूचा फिल्मफेअर पुरस्कार आणि 'सुभा संकल्पम' (१९९५) आणि 'मिस्टर पेल्लम' (१९९३) या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नंदी पुरस्कार मिळाला होता.
आमनी
यामागील विज्ञान आणि इतिहास.