जपानमधील सौर ऊर्जा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

जपानमधील सौर ऊर्जा

जपानमधील सौर ऊर्जेचा १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात विस्तार होताना दिसला. हा देश फोटोव्होल्टिक (पीव्ही) आणि घरात बसवता येण्याजोगी पीव्ही प्रणालीसाठीचा एक प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहे. घरातील पीव्ही प्रणाली बहुतेकदा ग्रिडला जोडलेली असते.

देशाच्या धोरणात बदल झाल्यापासून सौर ऊर्जा ही एक महत्त्वाची राष्ट्रीय प्राथमिकता बनली आहे. स.न. २०११ मध्ये घडलेल्या फुकुशिमा दाइची अणु आपत्तीनंतर नपानेने नवीकरणीय (अपारंपरिक) ऊर्जेवर अधिक लक्ष केंद्रित केले. २०१३ आणि २०१४ मध्ये सौर ऊर्जेच्या वाढीसाठी जपान जगातील दुसरा सर्वात मोठा बाजार बनला होता. ज्यामध्ये अनुक्रमे ६.९७ गिगावॅट आणि ९.७४ गिगावॅट क्षमता जोडली गेली. स.न. २०१७ च्या अखेरीस, एकूण क्षमता ५० गिगावॅटपर्यंत पोहोचली. ही चीननंतर जगातील दुसरी सर्वात मोठी सौर पीव्ही स्थापित क्षमता होती. २०१६ मध्ये एकूण स्थापित क्षमता देशाच्या वार्षिक वीज मागणीच्या जवळजवळ ५% पुरवठा करण्यासाठी पुरेशी असल्याचे अंदाज लावण्यात आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →