जगन्नाथ मंदिर (ओड़िआ: ଜଗନ୍ନାଥ ମନ୍ଦିର) हे भारत देशाच्या ओडिशा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो. असे म्हणतात की या मंदिराची उभारणी राजा अनंगभीमदेव याने केली व नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला व तेथील परीसर सुधरवला आणि पर्यटनास उपलब्ध केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जगन्नाथ मंदिर
या विषयातील रहस्ये उलगडा.