जगताप घराणे हे शिवपूर्वकालीन प्राचीन असे मातब्बर ९६ कुळी मराठा घराणे आहे. जगत्पती/जगत्प्रतापी या नावाचा अपभ्रंश होऊन जगताप हे नाव प्रचलित झाले. भरतपूर वरून सोमवंशी (चंद्रवंशी ) राजा वासुसेना यांचे वंशज सासवड व पणदरे या ठिकाणी येऊन स्थायिक झाले. जगताप घराण्यामध्ये सरकार, सरदार , देशमुख, जहागीरदार , पाटील, व इतर अनेक पदव्या मिळाल्या.
जगतापांचे गोत्र वड आणि गोत्र मांडाव्य/ अत्री आहे .
राजगादी : भरतपूर निशाण : ध्वजस्तंभावरील गणपती
हरजीराजे जगताप हे जगताप कुळातील मुळेपुरुष आहेत.
सरदार गोदाजीराजे जगताप हे त्यांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळचे बालपणीचे मित्र होते. शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या पहिल्या किल्ल्यासाठी त्यांनी तोरणा किल्ल्यावरील हल्ल्यात भाग घेतला होता.
सरदार खंडोजी जगताप व सरदार कृष्णाजी जगताप:पणदरे गावातील शिवाजी महारांजांच्या सैन्याखालील मराठा सरदार
जगताप
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.