चोपडा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका मुख्यत्वे केळीउत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. चोपडा शहर अंकलेश्वर - बुरहानपूर राष्ट्रीय महामार्गा वर वसलेले आहे. चोपडा तालुक्यात अडावद हे प्रमुख गाव आहे. चोपडा तालुक्यात खरद, नारोद, अंबाडे, वडगाव बु., पंचक, वर्डी, मंगरुळ, वडगाव सिम, धुपे, चहार्डि, वटार, सुटकार, चांदसणी-कमळगाव, गोरगावले, धानोरा वैगेरे गावे आहेत. तसेच अडावद जवळ तीर्थक्षेत्र उनपदेव देखील आहे. उनपदेव हे सातपुडा पर्वता जवळ असुन येथे गरम पाण्याचा झरा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चोपडा तालुका
या विषयातील रहस्ये उलगडा.