खेड तालुका (पुणे)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

खेड तालुका (पुणे)

खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे. पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा , तीर्थ क्षेत्र आळंदी , येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प , राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ,लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे... या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत... . गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत .......

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →