चेडर मानव

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

चेडर मानव

चेदार मानव हा १० हजार वर्षापूर्वीचा मानव होता. हा मानव कृष्णवर्णीय असून आजच्या गौरवर्णीय ब्रिटिशांचा पूर्वज होता. या मानवाचा एक पूर्ण सांगाडा १९०३ मध्ये सापडला असून हे ब्रिटनमध्ये सापडलेले सगळ्यांत जुने मानवी शरीराचे अवशेष आहेत.लंडनमधल्या नॅचरल हिस्टरी म्युझियमने १० हजार वर्षांपूर्वीच्या चेदार मानवाच्या डिएनएचे नमुने तपासले. या मानवाच्या चेहऱ्याची पुर्नरचना करण्यासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी या सांगाड्याचा जनुकीय अभ्यास केला. यातून सध्याच्या आधुनिक युरोपियन नागरिकांची त्वचा ही त्यांना मिळालेली फार अलिकडची देणगी असल्याचं समोर आले आहे. हिमयुगानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झालेला पहिला मानव समूह हा चेदार मानव असल्याची माहिती या अभ्यासातून प्राप्त झाली. हा मानव सध्याच्या मानवाइतकाच उंचीचा म्हणजे ५ फूट ५ इंच उंचीचा होता. तसेच त्याचा मृत्यू विशीत झाल्याचेही अभ्यासावरून स्पष्ट होते. म्युझियमच्या मानवी अवशेषांच्या अभ्यास विभागाचे प्रमुख प्रा. ख्रिस स्ट्रिंगर यांनी ४० वर्षांपासून चेदार मानवाच्या सांगाड्याचा अभ्यास केलेला आहे. त्यांना या चेदार मानवाच्या सांगाड्यावर आपल्याला या मानवाच्या केसांची रचना, केसांचा रंग, डोळ्यांचा रंग, आणि त्याच्या त्वचेचा रंग याची माहिती आहे.

चेदार मानवाचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता तर त्याच्या कवटीवर आघात करण्यात आला होता. कवटीला तडे गेले आहेत. संशोधकांनी त्याच्या कवटीच्या कानाजवळील भागातून डिएनए काढला आहे. त्या भागाला पेट्रोस असं म्हणतात. यातून त्यांचे केस, डोळे आणि त्वचेचा रंग या गोष्टींचा अभ्यासाची सुरुवात झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →