चेक प्रजासत्ताक क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२५ मध्ये चार आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी रोमेनियाचा दौरा केला. ही मालिका २१ ते २२ ऑगस्ट २०२५ दरम्यान खेळवण्यात आली. सर्व सामने मोआरा व्लासिएई क्रिकेट मैदान, इल्फोव काउंटी येथे झाले.
चेक प्रजासत्ताकने पहिला सामना १८ धावांनी जिंकला. रोमेनियाने दुसरा सामना १८ धावांनी आणि तिसरा सामना २५ धावांनी जिंकत मालिकेत २–१ अशी आघाडी घेतली. चेक प्रजासत्ताकने चौथा आणि अंतिम सामना चार गडी राखून जिंकला आणि मालिका २–२ अशी बरोबरीत सोडवली. रोमेनियाचे नेतृत्व वासू सैनीने, तर चेक प्रजासत्ताकचे नेतृत्व साहिल ग्रोव्हरने केले.
चेक प्रजासत्ताकच्या शरण रामकृष्णनने मालिकेत सर्वाधिक १६७ धावा केल्या, तर रोमेनियाकडून रमेश सतीसनने सर्वाधिक १३१ धावा केल्या. रोमेनियाच्या रमीझ खानने मालिकेत सर्वाधिक आठ बळी घेतले. चेक प्रजासत्ताककडून साजिब भुईयाँने सर्वाधिक सात बळी घेतले. रोमेनियाच्या अविष्का चंद्रसिरीला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
चेक प्रजासत्ताक क्रिकेट संघाचा रोमेनिया दौरा, २०२५
या विषयावर तज्ञ बना.