चित्रजवनिका : टॅपेस्ट्री, ताग, कापूस, लोकर किंवा रेशीम यांच्या अनेकरंगी धाग्यांनी विणलेले मुक्त चित्राकृतींचे पडदे म्हणजे चित्रजवनिका. सामान्यतः भिंतींवर लावण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. हा कलाप्रकार विणकामाइतकाच प्राचीन असून मध्य-आशियातून पूर्वेस आणि पश्चिमेस तो प्रसृत झाला असावा. याच्या प्रगतप्रकारात चित्राकृती विणण्यासाठी आडवे-उभे धागे काटकोनातच ठेवतात. पूर्वी बाह्यरेषेनुरूप आडवा धागा उभ्या धाग्यातून फिरविला जाई.
या विणकामात चित्रनमुन्यातील निरनिराळ्या रंगांचे छोटे आकार साधण्यासाठी, प्रत्येक आकारापुरता आडवा धागा उभ्या धाग्यांतून फिरतो. यासाठी वस्त्रविणीतील धोटा न वापरता रंगपरत्वे वेगळ्या तंतुकीला वापरतात. वक्ररेषांकित रंगाकार विणकामामुळे एकमेकांत गुंफले जातात, पण चित्ररेषा उभ्या आणि समांतर असल्या, म्हणजे त्यांच्या विणकामात फटी राहतात. काही प्रकारांत त्या तशाच ठेवतात, तर काहींत त्या निरनिराळ्या प्रकाराने सांधतात.
चित्रजवनिका
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.