सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, जुनियर, ऊर्फ चार्ली चॅप्लिन, (एप्रिल १६, इ.स. १८८९ - डिसेंबर २५, इ.स. १९७७) हा मूकपटांमध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. अभिनयासोबत तो मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात तो जगभरातल्या सर्वांत प्रसिद्ध सिनेताऱ्यांपैकी एक होता. हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांच्यात एक समानता आहे. दोघाच्या पण मिशा सारखे होते. पण हिटलरला पूर्ण जग घाबरत असे. आणि चार्ली चॅप्लिन, लोकांमध्ये असलेली भीती संपवून त्यांना भरभरून हसवले.
या महान कलाकाराचा जीवनात खूप दुःख होत. पण त्याने सर्व दुःख विसरून सर्वाना हासवण्यात आपले जीवन व्यतित केलं. त्या वेळी मूक चित्रपट असायचे, म्हणून चार्ली थोडासा जास्ती खास होतो. त्याने एकही शब्द न काढता सर्वाना हसवले.
चार्ली चॅप्लिन
थोडक्यात पण महत्त्वाचे.