चारकोप विधानसभा मतदारसंघ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

चारकोप विधानसभा मतदारसंघ - १६१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार चारकोप मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १६६७ आणि जनगणना वॉर्ड क्र. १५६५ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ५, २३ ते ५१, ५४, ३७७ आणि १४०१ ते १४०३ यांचा समावेश होतो. चारकोप हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाचे योगेश अमृतलाल सागर हे चारकोप विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →