चाकूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.हा तालुका लातूर जिल्ह्याच्या मध्यभागी स्थित आहे.या तालुक्यात मांजरा नदीचे खोरे आहेत.बालाघाटाच्या डोंगररांगा मध्ये ह्या तालुक्याचा विस्तार आहे.म्हणूनच येथे हकानी बाबा हे बेट अस्तित्वात आहे.ह्या तालुक्या मध्ये लोहमार्गाचा देखील विस्तार झाला आहे.लातूर जिल्ह्यातील एकमेव रेल्वे जंक्शन लातूर रोड याच तालुक्यात आहे.वनस्पती बेट म्हणून प्रसिद्ध असलेले वडवळ नागनाथ याचाच एक भाग आहे.याच तालुक्यातून रत्नागिरी ते नागपूर हा महामार्ग जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चाकूर तालुका
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.