चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यान हे युनेस्कोने जाहिर केलेले भारताच्या गुजरात राज्यातील पंचमहाल जिल्ह्यातील एक जागतिक वारसा स्थळ आहे. हे चंपानेर या ऐतिहासिक शहराभोवती वसलेले आहे, हे शहर ८व्या शतकात चावडा वंशातील सर्वात प्रमुख राजा वनराज चावडा याने वसवले होते. त्याने हे नाव आपल्या मित्राच्या आणि जनरल चंपा यांच्या नावावरून ठेवले.
हे वारसा स्थळ पावागडच्या टेकड्यांपासून सुरू होऊन चंपानेर शहरापर्यंत पसरले आहे. ह्यात पुरातत्वीय, ऐतिहासिक आणि जिवंत सांस्कृतिक वारसा स्मारके आहेत जसे की ताम्रपाषाण युगातील स्थाने, सुरुवातीच्या हिंदू राजधानीचा डोंगरी किल्ला आणि गुजरात राज्याच्या १६व्या शतकातील राजधानीचे अवशेष समाविष्ट आहेत. ८व्या ते १४ व्या शतकातील राजवाडे, प्रवेशद्वार, कमानी, मशिदी, थडगे, मंदिरे, निवासी संकुले, कृषी संरचना, वाव आणि टाक्या यांसारख्या अनेक वास्तू ह्यात आहे. पावागड टेकडीवर स्थित कालिका माता मंदिर या प्रदेशातील एक महत्त्वाचे हिंदू मंदिर आहे, जे वर्षभर मोठ्या संख्येने यात्रेकरूंना आकर्षित करते. २००४ साली ह्याल भारतातील जागतिक वारसा स्थानाचा दर्जा मिळाला.
चांपानेर-पावागढ पुरातत्त्व उद्यान
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.