चांदपुर जलाशय हे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी स्थित असलेले एक नैसर्गिक जलाशय (तलाव) आहे. या जलाशयाच्या पाण्याचा वापर तालुक्यातील शेतकरी भातशेतीसाठी व गावातील नागरिक नळाद्वारे पिण्यासाठी करतात. या जलाशयाला ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. सन २००० ते ऑगस्ट २०१२ पर्यंत या ठिकाणी पर्यटन जोरदार सुरू होते. जलाशयाचा पाणी सोडण्याचा दरवाजा ब्रिटीशकालीन आहे. या दरवाज्यातूनच सिंचनासाठी पाणी सोडले जाते.
भंडारा जिल्ह्यातील नंदनवन म्हणून या स्थळाची ओळख आहे. या स्थळाला ग्रीन व्हॅली चांदपुर या नावाने ओळखले जाते.
चांदपुर जलाशय
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!