गोसीखुर्द धरण

यामागील विज्ञान आणि इतिहास.

भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंचन सुविधा देण्याच्या उद्देशाने इंदिरासागर किंवा गोसीखुर्द (गोसेखुर्द) धरणाची स्थापना गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प म्हणून झाली. धरणाचा पाया २३ ऑक्टोबर १९८४ रोजी भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ठेवला होता. या ठिकाणी ९२ मीटर उंच आणि ६५३ मीटर लांबीचे कन्जेंट गुरुत्व धरण आहे. हे धरण सुमारे २४९ गावांचच्या पुनर्वसनानंतर तयार झाले आहे. सध्या, धरणाची ठिकाणे आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रातील सिंचन आणि विजेची गरज पूर्ण होते.

या प्रकल्पाची अंदाजित किंमत रुपये ३७२.२२ कोटी इतकी होती. हा प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे,याची किंमत वाढत वाढत सन २०१० मध्ये रुपये ११,५०० कोटी झाली होती. या प्रकल्पाची सुमारे ९०% कामे झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यातील गावांजवळ (तालुका-पवनी, जिल्हा-भंडारा) वैनगंगा नदीवर सुमारे ११.३५ किमी लांबीचे धरण बांधण्यात आले आहे. दोन विमोचक, चार उपसा सिंचन योजना व आसोलामेंढा तलावाच्या नुतानिकरनाद्वारे भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या सुमारे २,५०,८०० हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →