चांगदेव मंदिर मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव गावाजवळ आहे. पूर्णा नदीच्या काठी आहे. इथे मंदिरा जवळ उत्तरेस तापी आणि पूर्णा नदीचां सांगम आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीला इथे जत्रा भरते ज्यात आजू बाजूच्या क्षेत्रातून मोठ्या संख्येने भाविक चांगदेव महाराजांच्या दर्शनाला येतात. इथे चांगदेव महाराजांनी समाधी घेतली होती अशी अख्यिका आहे येथील मंदिर प्राचीन आहे व भारतीय पुरातत्त्व विभागाने येथे केलेल्या उत्खननात अनेक प्राचीन गणपतीच्या, विष्णूच्या प्राचीन मुर्त्या सापडलेल्या आहेत.मंदिर काळ्या रंगाच्या
दगडा पासून बनवलेले आहे. अत्यंत बारीक आणि प्रभावी नक्षीकाम येथील मंदिराच्या भिंतींवर केलेले आहे. मंदिराच्या परिसरात शनिदेवाच आणि महादेवाचं मंदिर आहे.
चांगदेव मंदिर (चांगदेव)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.