चरस हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन रामानंद सागर यांनी केले होते. या चित्रपटात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी मुख्य भूमिकेत असून अजित, अमजद खान आणि डॅनी डेंझोंग्पा यांनी महत्त्वाच्या खलनायकी भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट त्या काळातील आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करीवर आधारित एक अॅक्शन थ्रिलर होता, ज्याचे चित्रीकरण भारत, इटली, स्वित्झर्लंड आणि माल्टा देशांत केलेले होते. हा चित्रपट हा १९७६ सालातील बॉक्स ऑफिसवरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटातील लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली आणि आनंद बक्षी यांनी लिहिलेली कल की हसीन मुलाकात के लिये आणि आजा तेरी याद आयी ही गाणी लोकप्रिय झाली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चरस (१९७६ हिंदी चित्रपट)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.