चंद्रावती (राजकारणी)

या विषयातील रहस्ये उलगडा.

चंद्रावती (३ सप्टेंबर १९२८ - १५ नोव्हेंबर २०२०) या भारतीय राजकारणी होत्या. त्यांचा जन्म १९२८ मध्ये पूर्व पंजाबमधील भिवानी जिल्ह्यातील दलावास गावात झाला. त्यांचे वडील हजारीलाल शेओरान हे भारतीय सैन्यात कार्यरत होते.

१९५४ मध्ये त्या हरियाणा विधानसभेच्या पहिल्या महिला सदस्य होत्या आणि हरियाणाच्या पहिल्या महिला खासदार होत्या. १९ फेब्रुवारी १९९० ते १८ डिसेंबर १९९० पर्यंत त्या पुडुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर होत्या. १९६४-६६ आणि १९७२-७४ मध्ये त्या हरियाणा सरकारमध्ये मंत्री होत्या. १९७७ मध्ये, त्या जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून भिवानी मतदारसंघातून ६ व्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून आल्या आणि त्यांनी संरक्षण मंत्री बन्सी लाल यांचा पराभव केला. १९७७-७९ त्या जनता पक्षाच्या अध्यक्षा होत्या.

१९८२-८५ त्या विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या जेव्हा त्या लोक दल (चरण सिंग) मध्ये सामिल झाल्या होत्या. नंतर त्यांनी हरियाणातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला व तेथील त्या वरिष्ठ नेत्या होत्या.

१५ नोव्हेंबर २०२० रोजी रोहतकच्या पंडित भागवत दयाळ शर्मा इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचे निधन झाले. त्या ९२ वर्षाच्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →