चंद्रयान ३

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

चंद्रयान ३

चंद्रयान-३ ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (ISRO) तिसरी चंद्र शोध मोहीम आहे. यात चंद्रयान-२ प्रमाणेच लँडर आणि रोव्हर आहे, परंतु ऑर्बिटर नाही. ह्याचे प्रोपल्शन मॉड्यूल हे कम्युनिकेशन रिले उपग्रहासारखे वागेल. अंतराळयान हे १०० किमी चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत प्रोपल्शन मॉड्यूल हे लँडर आणि रोव्हर घेऊन गेले.

२२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-२ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अंशतः अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर इस्रोने नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २:३५ वाजता झाले. पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून १०० किमी गोलाकार ध्रुवीय कक्षाचे इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण झाले.

लँडर आणि रोव्हर २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६:०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरले. या मोहिमेमुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश आणि चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणारा चौथा देश बनला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →