आदित्य एल-१ ( संस्कृत: आदित्य, "सूर्य") हे सौर वातावरणाचा अभ्यास करणारे एक कोरोनग्राफी अंतराळ यान आहे, ज्याची रचना आणि विकास भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि इतर विविध भारतीय संशोधन संस्थांनी केला आहे. हे यान पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील L1 लॅग्रेंज बिंदूभोवती प्रभामंडल कक्षेत पृथ्वीपासून सुमारे १.५ दशलक्ष किमी अंतरावर स्थापित केले जाईल, जिथे ते सौर वातावरण, सौर चुंबकीय वादळे आणि पृथ्वीभोवतीच्या पर्यावरणावर होणारे परिणाम यांचा अभ्यास करेल.
सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी समर्पित केलेली ही पहिलीच भारतीय मोहीम आहे. निगार शाजी या प्रकल्पाच्या संचालक आहेत. २ सप्टेंबर २०२३ रोजी ११:५० IST वाजता PSLV-XL लॉन्च व्हेईकल वर प्रक्षेपित करण्यात आले. इस्रोच्या चांद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर दहा दिवसांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. सुमारे एक तासानंतर याने आपली अभिप्रेत कक्षा यशस्वीरित्या गाठली आणि IST १२:५७ वाजता चौथ्या टप्प्यापासून वेगळे झाले.
आदित्य (उपग्रह)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.