चंद्रप्रभा ऐतवाल (२४ डिसेंबर १९४१:धारचुला, पिथोरागढ जिल्हा, उत्तराखंड - ) भारतीय गिर्यारोहक आहेत. या १९७२ पासून गिर्यारोहण करीत असून त्यांनी कांचनगंगा, नंदादेवी, सतोपंथ अशा अनेक कठीण मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. इ.स. २०१६ साली भरलेल्या १५व्या गिरिमित्र संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या.
भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कारासाठी २००९ चा तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी नंदा देवी, कांचनगंगा, त्रिशुली आणि जओनली या पर्वतांची शिखरे सर केली आहेत.
चंद्रप्रभा ऐतवाल
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.