घनश्याम ओझा

या विषयावर तज्ञ बना.

घनश्याम छोटेलाल ओझा (२५ ऑक्टोबर १९११ – १२ जुलै २००२) हे मार्च १९७२ ते जुलै १९७३ दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते १९४८ ते १९५६ पर्यंत सौराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे सदस्य होते. पुढे ते १९५६ मध्ये मुंबई राज्याच्या विधानसभेचे सदस्य झाले.

१९७८ ते १९८४ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. ते १९७२-७४ पर्यंत गुजरात विधानसभेचे सदस्य होते. युनायटेड स्टेट ऑफ काठियावाडची स्थापना झाली तेव्हा ते यू.एन. ढेबर मंत्रालयात मंत्री (१९५२-५६) होते. १९५७ ते १९६७ मध्ये सुरेंद्र नगरमधून लोकसभेची जागा जिंकून ते खासदार झाले. १९७१ मध्ये राजकोट मतदारसंघाची लोकसभा निवडणुकीत ओझा यांनी मिनु मसानी यांचा पराभव केला आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री बनले.

ओझा यांनी इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला विरोध केला आणि १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन जनता पक्षासाठी काम केले. ते १९७८ ते १९८४ पर्यंत ते गुजरातमधून राज्यसभेवर (जनता पक्ष) निवडून आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →