ग्नू प्रकल्प हा एक मुक्त सॉफ्टवेर प्रकल्प आहे. याची सुरुवात २७ सप्टेंबर, इ.स. १९८३ साली रिचर्ड स्टॉलमन याने मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये केली. या प्रकल्पाद्वारे ग्नू संचालन प्रणालीचा विकास इ.स. १९८४ साली चालू झाला. या प्रकल्पाचा उद्देश "...मुक्त सॉफ्टवेरची रचना ..... इतर (मुक्त नसणाऱ्या) सॉफ्टवेरच्या तोडीस करण्यासाठी...." आहे.
ग्नू हे "ग्नू इज नॉट युनिक्स" (इंग्लिश: GNU's Not Unix) या वाक्याचे लघुरूप आहे.
ग्नू प्रकल्प
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.