ग्वातेमालाचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Guatemala) हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. ग्वातेमाल्याच्या उत्तरेला व पश्चिमेला मेक्सिको, आग्नेयेला होन्डुरास व साल्वाडोर, पूर्वेला बेलिझ व कॅरिबियन समुद्र तर नैऋत्येला प्रशांत महासागर आहे.
ऐतिहासिक काळात मेसोअमेरिकेच्या माया संस्कृतीचा भाग असलेला ग्वातेमाला १६व्या शतकापासून स्पेनच्या अधिपत्याखाली होता. १८२१ साली ग्वातेमालाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथे अनेक हुकुमशहांनी सत्ता गाजवली. १९६० ते १९९६ दरम्यान ग्वातेमालामध्ये प्रदीर्घ यादवी युद्ध चालू होते. त्यानंतरच्या काळात येथे लोकशाहीवादी सरकार असून अनेक आर्थिक सुधारणा घडून आणल्या गेल्या आहेत.
ग्वातेमाला लॅटिन अमेरिकेतील सर्वांत १० गरीब देशांपैकी एक आहे. येथील ५६.२ टक्के लोक दारिद्र्यरेषेच्या खाली राहतात. यादवी युद्धादरम्यान अनेक ग्वातेमालन लोक अमेरिकेमध्ये स्थानांतरित झाले. ह्या लोकांनी कुटुंबियांसाठी पाठवलेली रक्कम हा ग्वातेमालाच्या परकीय मिळकतीचा सर्वात मोठा भाग आहे.
ग्वातेमाला
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.