आर्जेन्टिना (स्पॅनिश: Argentina; उच्चार: आर्हेन्तिना (द.अ.) किंवा आर्खेन्तिना (स्पे.)) हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. ४ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ २८ लाख चौरस किलोमीटर एवढे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आर्जेन्टिना दक्षिण अमेरिकेतील दुसरा तर जगातील आठवा मोठा देश आहे. या देशाचा धर्म ख्रिश्चन असून येथे स्पॅनिश व इटालियन भाषा बोलल्या जातात. फक्त दक्षिण अमेरिका खंडाचा विचार केल्यास हा देश आकाराने दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा देश बोलीव्हिया व केप हाॅर्नच्या मध्ये ३७०० किमी. लांब पसरलेला आहे. याची जास्तीत जास्त रुंदी १५०० किमी. आहे. अमेरिकेतील एका भव्य पर्वताचे '''अकंकागुआ''' नावाचे सर्वात उंच शिखर मात्र या देशात आहे. सन १८१६मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाले. जगातील डिएगो मॅराडोना, लायोनेल मेस्सी हे नाववंत फुटबॉलपटू याच देशातील आहेत. आर्जेन्टिनात कोळसा, शिसे, तांबे, जस्त, सोने, चांदी, निकेल व गंधकाचे साठे आहेत. हवाबंद डब्यात मांस भरून निर्यात करने, हा आर्जेन्टिनाचा प्रमुख उद्योग आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आर्जेन्टिना
यामागील विज्ञान आणि इतिहास.