रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर (जन्म : पुणे, ९ जानेवारी १८५४; - पुणे, ४ जून १९१८) हे मराठी कवी व भाषांतरकार होते.
कानिटकरांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात आणि उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजात झाले. १८७६मध्ये ते बी.ए. झाले. एल्एल.बी झाल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तीन वर्षे वकिली केली. नंतर ते सरकारी न्यायालयात मुन्सफ झाले. त्यांच्या पत्नीचे नाव काशीताई कानिटकर. या लेखिका होत्या. प्रसिद्ध नाटकककार नारायण बापूजी कानिटकर हेही त्यांच्या कुटुंबीयांपैकी एक होते. इचलकरंजीचे संस्थानिक बाबासाहेब घोरपडे ह्यांच्या स्नुषा अनुताई घोरपडे ह्या कानिटकरांच्या कन्या होत्या. स्वतः गोविंद वासुदेव कानिटकर हे चित्रकला आणि संगीत या कलांचे ज्ञाते होते. त्यांचा व हरी नारायण आपटे यांचा स्नेह होता.
गोविंद वासुदेव कानिटकर
या विषयातील रहस्ये उलगडा.