गोविंद पानसरे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

गोविंद पानसरे (जन्म : कोल्हार, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर, २४ नोव्हेंबर १९३३; - मुंबई, २० फेब्रुवारी २०१५) हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते होते. इ.स. १९५२ पासून कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असलेले पानसरे अनेक सामाजिक चळवळीत सक्रिय होते. त्यांनी कामगारांसाठी तसेच घर कामगार महिलांसाठी अनेक लढे उभारले. ते कोल्हापूर टोलविरोधी आंदोलनातही अग्रभागी होते. कोल्हापूरमध्ये १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळीबार केला. २० फेब्रुवारी २०१५ रोजी उपचारादरम्यान त्यांचे मुंबईमध्ये निधन झाले..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →