श्रीपाद अमृत डांगे (१० ऑक्टोबर, १८९९; करंजगाव-नाशिक - २२ मे, १९९१) ह्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची १९२५ साली स्थापना केली. ते तत्कालीन मुंबई प्रांतातील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५७ आणि इ.स. १९६७च्या निवडणुकांमध्ये निवडून गेले.
कॉम्रेड डांगे यांना भारतातील कम्युनिस्ट चळवळीतील भीष्माचार्य असे म्हणतात. भारतीय कामगार चळवळीचे ते अध्वर्यू समजले जातात. त्यांनी भारतावरच्या ब्रिटिश राजवटीत आयुष्याची १३ वर्षे तुरुंगात काढली. संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठा वाटा होता. डांगे हे अप्रतिम वक्ते होते. प्रारंभी शांत आणि सौम्य आवाजात सुरू झालेली त्यांची माहितीपूर्ण भाषणे प्रसंगी आणि अंती प्रक्षोभक असत.
रोझा देशपांडे या काॅम्रेड डांगे यांची मुलगी तर विद्याधर लक्ष्मण देशपांडे उर्फ बानी देशपांडे हे त्यांचे जावई. या दोघांनी मिळून 'श्रीपाद अमृत डांगे विविध विचार संग्रह' नावाचे पुस्तक लिहिले आहे.
डाॅ. अशोक चौसाळकरांनी 'काॅ. श्रीपाद अमृत डांगे' नावाचे डांग्यांचे चरित्र लिहिले आहे.
विरेंदर ग्रोव्हर यांनी डांग्यांचे 'Shripad Amrit Dange : A Biography Of His Vision And Ideas' नावाचे चरित्र लिहिले आहे.
भारतीय लोकसभेच्या सचिवालयाने त्यांच्या लॊकसंभॆच्या कारकिर्दीवर 'Comrade Shripad Amrit Dange' नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.
विविध लेखकांनी लिहिलेला Shripad Amrit Dange या नावाचा ग्रंथ Jesse Russell, Ronald Cohn यांनी संपादित केला आहे.
श्रीपाद अमृत डांगे
या विषयातील रहस्ये उलगडा.