प्रा. गोविंद गंगाराम काजरेकर हे एक मराठी कवी, समीक्षक आणि मालवणी बोली या विषयावर लेिहिणारे लेखक आहेत. गोविंद काजरेकर यांचा जन्म २९ मे १९६९ मध्ये कोकणातील सावंतवाडी या तालुक्यातील तळवडे या गावी झाला. प्राथमिक ते उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण याच गावी झाले. महाविद्यालयीन शिक्षण सावंतवाडी येथील श्री. पंचम खेमराज महाविद्यालय येथे तर पदव्युत्तर शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले. राजन गवस यांचे कथात्म साहित्य याविषयावर त्यांनी गोवा विद्यापीठ येथून पी. एच. डी. ही पदवी प्राप्त केली. सध्या ते गोगटे- वाळके महाविद्यालय, बांदा, ता. सावंतवाडी येथे प्राचार्य व मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
काजरेकर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक एम. ए. च्या दोन पुस्तकांचे लेखन केले आहे.
काजरेकर हे २०१५ पासून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात पीएच. डी.चे मार्गदर्शक आहेत.
गोविंद काजरेकर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.