गोपाळ देऊसकर हे मराठी चित्रकार होते. १९२७-३६ दरम्यान मुंबईच्य जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या मानांकित संस्थेत त्यांनी चित्रकलेचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतले. पुढे निजामाने खास शिष्यवृत्ती देऊन चित्रकलेच्या प्रगत अभ्यासाकरता त्यांना युरोपात पाठवले. १९३४, १९३६, १९३८ साली लंडनमधील चित्रप्रदर्शनांत त्यांची चित्रे मांडण्यात आली होती. भारतात परतल्यावर त्यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट संस्थेच्या डेप्युटी डायरेक्टर पदावर नेमले गेले. त्यांच्या चित्रकौशल्यामुळे बॉंबे आर्ट सोसायटीने त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवले. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिरातील त्यांनी रंगविलेली भित्तिचित्रे अतिशय प्रसिद्ध आहेत. फेब्रुवारी ८, १९९४ रोजी त्यांचे निधन झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोपाळ देऊसकर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?