भौतिकीत गॉसचा चुंबकीचा नियम हे अभिजात विद्युतचलनगतिकीमधल्या मॅक्सवेलच्या चार समीकरणांपैकी एक आहे. हा नियम असे सांगतो की चुंबकी क्षेत्र Bचे अपसरण शून्य असते. दुसऱ्या शब्दांत हे गुंडाळ सदिश क्षेत्र (सोलेनॉइड व्हेक्टर फिल्ड) आहे. ह्याच अर्थाने चुंबकी एकध्रुव अस्तित्त्वात नाही असेपण म्हणले जाऊ शकते. (चुंबकीचा मूलभूत घटक "चुंबकी प्रभार" नसून चुंबकी द्विध्रुव आहे. तथापि एकध्रुवाचे अस्तित्त्व सिद्ध झाले तर ह्या नियमात बदल करावे लागेल.)
गॉसचा चुंबकी नियम दोन रूपांत लिहिता येऊ शकते - भैदिक रूप आणि ऐकन रूप. अपसरण सिद्धांतामुळे ही दोन रुपे समान आहेत.
"गॉसचा चुंबकीचा नियम" " हे नाव वैश्विकरित्या वापरली जात नाही. हा नियम "मुक्त चुंबकी ध्रुवाचे नास्तित्व" म्हणूनही ओळखला जातो; एक संदर्भ ह्याचे "नाव नाही" असे उघडपणे सांगतो.
गॉसचा चुंबकीचा नियम
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.