गुलाम मोहम्मद शाह

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

गुलाम मोहम्मद शाह किंवा गुल शाह (२० जुलै १९२० – ६ जानेवारी २००९) हे एक भारतीय राजकारणी होते. शाह यांनी अवामी नॅशनल कॉन्फरन्स या नवीन पक्षाची स्थापना केली होती. २ जुलै १९८४ ते ६ मार्च १९८६ दरम्यान जम्मू आणि काश्मीर राज्याचे ५ वे मुख्यमंत्री होते. त्यांचे मेहुणे फारुख अब्दुल्ला यांच्यानंतर ते पदावर होते. शाह यांचे सासरे शेख मोहम्मद अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक होते, ज्यापैकी शाह एकेकाळी ज्येष्ठ सदस्य होते. शाह यांचे ६ जानेवारी २००९ रोजी श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →