डॉ. गुरुराज मुतालिक, एम.डी एफ्एएम्एस, हे पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये आधी प्राध्यापक व नंतर अधीक्षक होते. पुढे महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंडळाचे संचालक असताना त्यांना जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) निमंत्रण आले आणि ते अमेरिकेत 'डब्ल्यूएचओ'मध्ये संचालकपदी रुजू झाले. या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी २००९ सालापासून अमेरिकेतच 'माइंड, बॉडी मेडिसीन' (एम्बीएम)चा अभ्यास सुरू केला.
डॉ. गुरुराज मुतालिक यांचा जन्म मार्च १९२९मध्ये भारतातल्या कर्नाटक राज्यातील एका खेड्यात झाला. त्यांचे वडील कर्मठ असून त्यांचे परंपरागत धर्मशास्त्राचे चांगले अध्ययन होते. ते संस्कृत भाषेचे जाणकार व वेदान्त विषयात प्रवीण होते. ते स्वतः रुग्णांवर आयुर्वेदाचे उपचार करीत. त्यांनी गुरुराजसह आपल्या सर्व मुलांना या विषयांची गोडी लावली.
गुरुराज मुतालिक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.